Saturday, July 16, 2011

नुकत्याच झालेल्या मुंबईमधील बॉम्बस्फोटांबद्दल ....

मुंबईमधील  बॉम्बस्फोट हे अतिरेक्यांचे कृत्य अत्यंत निर्घृण आहे, मानवतेला काळिमा पुन्हा एकदा फासणारे आहे हे सांगायला नको. त्यामध्ये बळी गेलेल्या निष्पाप जीवांबद्दल, त्यांच्या कुटुंबियांबद्दल मनःपूर्वक सहानुभूती वाटते. कुणाही अशा कटू प्रसंगांना सामोरे जावे लागू नये.
 
"घटना स्थळी प्रत्यक्ष भेट देणे", एकमेकांवर चिखलफेक करणे, प्राप्त परिस्थितीत तापलेल्या तव्यावर आपापली पोळी भाजून घेणे वगैरे राजकारणी मंडळींचे नेहमीचे उद्योग सुरु झालेच आहेत.
 
या घटनेची जबाबदारी अजूनही कुणी (म्हणजे अतिरेकी संघटनेने) घेतलेली नाही.
 
पोलीस, ATS, NSG वगैरे मंडळी त्यांच्या कर्तव्याचा भाग, जबाबदारी म्हणून शोध मोहीम राबवीत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश येवोच.
 
पुढे गुन्हेगार पकडले जातील. सरकारी वकील जीवाचे रान करून गुन्हेगाराला फाशीच्या तख्तापर्यंत घेऊन जातील.
 
त्यापुढे काय ? माफीचा अथवा दयेचा अर्ज.... सन्माननीय राष्ट्रपतींच्या 'Inbox' मध्ये त्यांच्या निर्णयाची वाट पाहत सुरक्षित राहील आणि मानवतेचे गुन्हेगार सुखात, आनंदात आणि कडेकोट सुरक्षेत उर्वरित आयुष्य भारत सरकारच्या खर्चाने जगतील.
 
यापेक्षा वेगळे मत आपले असल्यास जरूर सांगा. मला तर याहून निराळे चित्र दिसत नाही.

1 comment:

  1. आणि यापेक्षा वेगळे चित्र दिसणारही नाही . कारण आपल्या गुप्तचर संघटना अतेरीकी हल्ला होण्याआधी त्याची पाळेमुळे खणण्यापेक्षा तो झाल्या नंतर गुन्हेगारांना शोधण्यासाठीची पराकाष्टा करतात. काहीना पकडतात ,काही सापडत नाहीत . जे सापडतात ते भारताचे जावई होतात . आमच्यासारख्या कित्येक लोकांनी सरकारकडे जमा केलेल्या करावर ऐश करतात.आज आम्ही कर भरतो तरी आम्ही सर्व सामान्य असुरक्षित आणि ते मात्र ......... सर तुम्ही म्हणालात तसे भारत सरकारच्या म्हणजेच आमच्या सारख्या सर्वसामन्यांच्या खर्चाने आयुष्यभर With high medical service जगणार आणि आम्ही त्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये कुत्र्याच्या मौतीने मरणार. विठ्ठला अजब तुझे सरकार .......
    सर तुम्ही blog सुरु केल्याबद्दल शुभेच्छा . रोज आम्हाला तुमच्याकडून काहीतरी नवीन मिळेल ह्यामध्ये आम्हाला काही शंका नाही. धन्यवाद.

    ReplyDelete